|| परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय ||

अनुग्रहासंबंधी सूचना

परमपूज्य आईंच्याकडून मंत्रोपदेश (अनुग्रह) घ्यायचा असल्यास परमपूज्य आईंनी सांगितल्याप्रमाणे खालील गोष्टींचे आपल्याकडून पालन होईल किंवा नाही याचा पूर्ण विचार करुनच अनुग्रह घेण्याचा विचार निश्चित करावा.

) परमपूज्य आईंच्याकडून अर्थात सदगुरुंच्याकडून अनुग्रह घेणे म्हणजे यापुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराची नित्यनियमित उपासना चालविणे व त्यांच्या सुचनेनुसार वागण्याचे प्रतिज्ञापूर्वक कबूल करणे, अर्थात वचनबद्ध होणे होय. हा एक शपथविधी असल्यासारखाच आहे. परमपूज्य आईंनी नित्याची जी उपासना चालू केली आहे, त्या उपासनेला दिवसातून किमान एक वेळ तरी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोकरीनिमित्त अथवा कोणत्यातरी अपरिहार्य कारणामुळे आपल्याला भजनाला येण्यास जमत नसेल तर घरी का होईना दीड तास हा नेम चालवावा. परंतू भजन म्हणायलाही जर येत नसेल तर घरी दीड तास नामस्मरण करावे. एकूण दिवसातून किमान दीड तास तरी ईशचिंतनासाठी वेगळा राखून ठेवला पाहिजे.

) परमपूज्य आईंनी लिहिलेल्या प्रकाशनांचे क्रमवार एकापाठोपाठ एक वाचन करणे व फावल्यावेळी नामस्मरण करणे.

) परमपूज्य आई आपल्याला सांगतात की, आपण आपले नांव शाळेत दाखल केल्यानंतर नियमित व वेळेवर शाळेला जाणे, अभ्यास करणे इत्यादी जसे जरुरीचे समजतो, त्याप्रमाणे सदगुरुंच्या शाळेत एकदा नांव दाखल झाल्यावर (अनुग्रह घेतल्यावर), नित्यनियमित अभ्यास, म्हणजेच उपासना करणेही तितकेच जरुरीचे वाटले पाहिजे. अन्यथा अनुग्रह घेऊन जर का परमपूज्य आईंनी सांगितल्याप्रमाणे उपासना आपल्याकडून घडली नाही तर देव खूश होईल का ? व त्याचा आशीर्वाद  आपल्याला मिळेल का? याचा विचार केला पाहिजे. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाईल तर आपण सदगुरुंच्याकडे खोटे बोलल्यासारखे होते.

परमपूज्य आईंनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे श्रीहरिमंदिरात उतरून, अनुग्रहाचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या भक्तमंडळींनी, प्रथम आपण उपासनेला जात असलेल्या शाखेतर्फे श्रीहरिमंदिरात पत्र पाठवून आपण कोणत्या तारखेला येऊ इच्छितो ते कळवावे. श्रीहरिमंदिरातून, “येण्यास हरकत नाहीअसे उत्तर आल्यावरच येण्याचे करावे. अनुग्रह घेणार्‍यांनी अनुग्रहाच्या आदल्या दिवशी श्रीहरिमंदिरात येण्याचे करावे व अनुग्रहाच्या दिवशी सर्व उपासना व नामस्मरणाचा लाभ घेऊन दुसर्‍या दिवशी जाण्याचे करावे. येताना आपल्याबरोबर पुरेसे अंथरूणपांघरूण घेऊन येण्याचे करावे व सोबत लहान मुलांना आणू नये.

पत्ता-
परमार्थ निकेतन (श्रीहरिमंदिर)
७३४, अनगोळ रोड,
टिळकवाडी – पूर्व,
बेळगांव – ५९०००६.

– अनुग्रहाचे दिवस –

परमपूज्य आईंच्या समाधीसमोर त्यांच्या ध्वनिमुद्रित केलेल्या टेपवरून खाली दर्शविलेल्या दिवशी सकाळच्या भजनानंतर भक्तांना अनुग्रह देण्याची व्यवस्था केली आहे.

१) चैत्र शु. १ – गुढीपाडवा.
२) चैत्र पौर्णिमा – हनुमानजयंती.
३) वैशाख शु. ३ – अक्षय्य तृतीया.
४) आषाढ शु. १५ – गुरुपौर्णिमा.
५) श्रावण वद्य १ – श्रीसिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथि.
६) भाद्रपद – परमपूज्य आईंच्या जयंतीनिमित्त सप्ताहाच्या २, ५, ७ या दिवशी.
७) आश्विन शु. १० – विजयादशमी. (दसरा)
८) मार्गशीर्ष पौर्णिमा – दत्तजयंती.
९) माघ परमपूज्य आईंच्या पुण्यतिथीसप्ताहातील २, ५, ७ या दिवशी.
१०) माघ वद्य १४ – महाशिवरात्र