श्रीहरिमंदिरात येण्याविषयी सूचना
परमपूज्य आईंनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे श्रीहरिमंदिरात उतरून, इकडील सर्व उपासनांचा अथवा अनुग्रहाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भक्तमंडळींनी, आपण ज्या उपासनाकेंद्रात नियमित प्रार्थनेला जातो, तेथे आपण कोणत्या तारखेस येऊ इच्छितो ते कळवावे. केंद्रद्वारे श्रीहरिमंदिराला विनंतीपत्र पाठविले जाईल. श्रीहरिमंदिरातून ” येण्यास हरकत नाही ” असे उत्तर आल्यावरच येण्याचे करावे. म्हणजे दोन दिवस राहण्याची सोय होईल. येताना आपल्या बरोबर लहान मुलांना आणू नये.
श्रीहरिमंदिर, बेळगांव येथे पत्रव्यवहार करताना परमपूज्य आईंच्या नावानेच करावा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी किंवा व्यक्तिगत नावाने पत्रव्यवहार करण्याचे करू नये. ही गोष्ट काटेकोरपणे सर्वांनी पाळावी, ही नम्र विनंती.
पत्ता-
परमार्थ निकेतन (श्रीहरिमंदिर)
७३४, अनगोळ रोड,
टिळकवाडी – पूर्व,
बेळगांव – ५९०००६.